उस्मानाबादेत घोषणाबाजी, जोडे मारो आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उस्मानाबाद शहरातील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करीत भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली; तसेच जोडे मारो आंदोलन भाजपचे जयभगवान गोयल यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

उस्मानाबाद : भाजपचे जयभगवान गोयल यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून पुतळा जाळण्यात आला. शहरातील शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 13) हे आंदोलन केले. यावेळी त्यांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली; तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. 

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले  

दिल्ली येथील भाजपच्या कार्यालयात जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या "आज के शिवाजी ः नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील शिवाजी महाराज चौकात येऊन या प्रकाराचा निषेध केला.

दुपारी एक वाजता कार्यकर्त्यांनी चौकात एकत्रित येत भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली; तसेच गोयल यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

'शिवाजी महाराजांचे कार्य एकमेवाद्वितीय आहे. त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. शिवप्रेमींच्या भावना दुखवू नये. भाजपमधील अशा प्रवृत्ती शिवप्रेमींच्या भावना दुखावीत आहेत. त्यासाठी हे आंदोलन करावे लागले' अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी या वेळी व्यक्त केली.

हे पुस्तक माघारी घ्यावे, बाजारात पुस्तक उपलब्ध झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, डॉ. प्रतापसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, तुषार वाघमारे, पक्षाच्या प्रवक्ता सेलचे प्रा. सुशील शेळके, नंदकुमार गवारे, विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंतनू खंदारे आदी या वेळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Congress Movement in Osmanabad