चित्ररथांनी वाढवली नाट्यदिंडीची शोभा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

उस्मानाबाद - येथे आयोजित करण्यात आलेल्या ९७व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्‌घाटनापूर्वी आज भव्य नाट्यदिंडी काढण्यात आली. पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके, चित्ररथ सोहळ्याचे आकर्षण ठरले. अनेक प्रसिद्ध कलाकार दिंडीमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे कलावंतांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.

येथील जिजामाता उद्यानासमोरील राममंदिरापासून निघालेल्या नाट्यदिंडीच्या उद्‌घाटनप्रसंगी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, नाट्यसंमेलनाचे मावळते अध्यक्ष गंगाराम गवाणकर, अध्यक्ष जयंत सावरकर, स्वागताध्यक्ष तथा आमदार सुजितसिंह ठाकूर, अभिनेते गिरीश ओक, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नाट्यपरिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाळांनी वेगवेगळ्या पथकांद्वारे सहभाग नोंदविल्याने दिंडीचे आकर्षण ठरले होते.  

उस्मानाबाद शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या नाट्यदिंडीत टाळ व मृदंगाच्या तालावर पावली खेळणाऱ्या वारकऱ्यांच्या वेशभूषेतील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. पारंपरिक कला सादर करणारे बहुरूपी, पिंगळा, वासुदेव, वाघ्या-मुरळी, गोंधळ, जागरण, शाहिरी कला व मर्दानी खेळ सादर करणाऱ्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.

Web Title: natya dindi shobha

टॅग्स