नाट्यमहोत्सवात "यंदा कदाचित' नाटकाची धूम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

उस्मानाबाद - धीरगंभीरता, हास्यांचे फवारे अन्‌ विविध स्तरांतील महिलांच्या संवादाचे दर्शन घडवीत "यंदा कदाचित' नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. मुलींचे कमी होत असलेले प्रमाण अन्‌ त्याला जबाबदार असलेल्या विविध चालीरीतींचा विनोदी ढंगांत समाचार घेत स्त्रीभ्रूणहत्या हा ज्वलंत विषय नाटकातून मांडण्यात आला. संतोष पवार लिखित या नाटकाला उस्मानाबादकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तुळजाभवानी स्टेडियमवरील मुख्य रंगमंचावर सोमवारी (ता. 17) संध्याकाळी मोठी गर्दी केली होती. 

97 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या नाट्यमहोत्सवात "यंदा कदाचित' या नाटकाने अनेकांना मंत्रमुग्ध केले. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास या प्रयोगाला सुरवात झाली. मंगळा गौरीच्या गीताने प्रयोग सुरू झाला. तमाशात, डान्सबारमध्ये काम करणारी महिला, सामान्य कुटुंबातील स्त्री, श्रीमंत कुटुंबातील स्त्री अशा स्तरांवरील महिलांच्या त्यांच्या कुटुंबाविषयी असलेल्या भावनाही नाटकात मांडण्यात आल्या. संतोष पवार यांनी या नाटकात बॉबी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. महिलांना योग्य दिशा देण्यासाठी बॉबीने केलेल्या प्रयत्नांनी प्रेक्षकांत हास्याचे फवारे उडवून दिले आणि विचार करायलाही भाग पाडले. स्त्रीभ्रूणहत्या आणि त्याला जबाबदार समाजातील अनिष्ठ रूढींवर या नाटकात भाष्य करण्यात आले आहे. नाटकाची मांडणी अतिशय हलक्‍याफुलक्‍या भाषेत असल्याने अनेकांना हे नाटक आपलेसे वाटते. सर्वच नवोदित कलाकारांनी नाटकांत उत्तम व्यक्तरेखा साकारल्या आहेत. 

Web Title: natya mahostav in osmanabad

टॅग्स