Over 100 Acres of Sugarcane Destroyed in Minutes
Sakal
मराठवाडा
Paithan Fire : नवगाव येथे डोळ्यांसमोर जाळला आयुष्याचा आधार; विद्युत वाहीनीच्या ठिणगीने उसाला आग, शेतकऱ्यांचे अश्रू अनावर!
Navgaon SugarcaneFire : नवगाव येथे विद्युत वाहीनीच्या ठिणगीमुळे लागलेल्या भीषण आगीत शंभर एकरांहून अधिक ऊस जळून खाक झाला. या दुर्घटनेत पंधरा शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाचोड : शेतातील तोडणीला आलेल्या उसाच्या फडाला विद्युत वाहीनीच्या घर्षणाने ठिणग्या पडून लागलेल्या आगीत पंधरापेक्षा अधिक शेतकऱ्याच्या शेतातील जवळपास शंभर एकरावरील उस जळून शेतकऱ्याची कोट्यावधी रुपयांची नुकसान झाल्याची घटना नवगाव (ता.पैठण) येथे रविवारी (ता. ३०) दुपारी घडली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे आठ कोटीपेक्षा अधिक रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

