
जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश परीक्षेसाठी गुरूवारपासून (ता. २२) ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे.
लातूर : जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश परीक्षेसाठी गुरूवारपासून (ता. २२) ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. पाचवीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असून, विद्यार्थ्यांनी २२ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य आर. रामू यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणाऱ्या दरवर्षी विद्यालयातील ८० जागांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. परीक्षेतील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश देण्यात येतो. विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत भोजन, गणवेश, निवास, वह्या, पुस्तके आदींची मोफत व्यवस्था केली जाते. केंद्रीय शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम विद्यालयात शिकवला जातो.
शासकीय कापुस खरेदी केंद्र कधी होणार सुरू? शेतकऱ्यांना प्रतिक्षा, खासगी व्यापाऱ्यांकडून लूट
येत्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी पूर्व परीक्षेची तयारी सुरू झाली असून, पाचवीत शिक्षण घेत असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. विद्यार्थी, पालक व शाळांनी www.nvshq.org किंवा www.nvsadmissionclasssix.in या संकेतस्थळावरून हे ऑनलाईन अर्ज करावेत व अधिक माहितीसाठी विद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य रामू यांनी केले आहे.
संपादन - गणेश पिटेकर