नांदेडमध्येही राष्ट्रवादीला खिंडार; जिल्हाध्यक्षांचाच रामराम

नवनाथ येवले
सोमवार, 29 जुलै 2019

लोकसभा निवडणूकी नंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी जवळीक साधत पक्षकार्यापासून अलिप्त राहीलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (ग्रा.) बापुसाहेब गोरठेकर यांनी साेमवारी (ता. 29)  शेकडो कार्यकर्त्यांची बैठक बालावली होती.

नांदेड : राष्ट्रवादी (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांनी स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप करत सोमवारी (ता. 29) राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या निवास्थानी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत गाेरठेकरांनी भूमिका जाहिर केली.

लोकसभा निवडणूकी नंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी जवळीक साधत पक्षकार्यापासून अलिप्त राहीलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष (ग्रा.) बापुसाहेब गोरठेकर यांनी साेमवारी (ता. 29)  शेकडो कार्यकर्त्यांची बैठक बालावली होती. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय
रेड्डी यांच्या निवास्थानी आयोजी बैठकीस कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री.
रेड्डी, राजेश देशमुख, मारोतराव कवळे, धर्मराज देशमुख, शिरीष देशमुख,
भाऊसाहेब गोरठेकर, राजेश्‍वर बंगलवार, जगन शेळके, लक्ष्मण पाटील, भास्कर भिलवंडे, मारोतराव मनुरकर, वसंत देशमुख, रमेश सरोदे, सदाशिव पप्पुलवाड, मारोतराव कवडे, तुकाराम मोरे, यशवंत शिंदे, विश्‍वनाथ पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसच्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष
गोरठेकर यांच्या राजकिय भुमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. गोरठेकर यांची खासदार चिखलीकर यांच्याशी जवळीकीमुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. गोरठेकर यांनी मधल्याकाळात पक्षकार्यापासून दुरावा साधला होता. लोकसभा निवडणूकीत गोरठेकरांनी आघाडीधर्म पाळला नसल्याचा आमदार चव्हाण यांच्या आरोपाचा समाचार घेत
गोरठेकर म्हणाले की, इमाने, इतबारे पक्षाचे काम केले, या उलट मजी
मुख्यमंत्री आशोक चव्हाण यांच्यामुळ मला दोन वेळा पराभव पचववा लागला.

शंकरराव चव्हाणांच्या नावावर राजकारण करणारांनी जिल्हापरिषदअंतर्गत
दलितवस्तीच्या निधीला मा. न्यायालयातून स्टे आनला. लोकांना विकास हवा आहे. विकासाच्या दिशेन झेपावणाऱ्या नेतृत्वाला मतदार साथ देत असल्याने जय-पराजय लिखीत असताे. जिल्ह्यातील आहीरावन-महिरावन च्या जाेडीने राष्ट्रवादीची वाट लावल्याचा टोलाही आमदार प्रदिप नाईक, माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांचे नावघेता त्यांनी लगावला. जिल्ह्यातील या
राहू-केतूच्या जोडगळीला वैतागून मला आज वेगळी भुमिका जाहिर करावी लागत आहे. ‘काही करा पण आमदार व्हा’ असा सल्ला फोनद्वारे कार्यकर्ते देत आहेत. कुठल्याही पक्षाकडून तुर्तास ऑफर आलेली नाही पण लवकरच पुढची भूमिका जाहिर करणार असल्याचेही गोरठेकर म्हणाले. यावेळी विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या भुमिका मांडल्या.

शरद पवार यांच्यावर निष्ठा: स्थानिकच्या राहू-केतुच्या जोडगळीला कंटाळून
पक्ष सोडत असलो तरी राष्ट्रवादीचे सर्वेसार्वा शरद पवार यांच्यावर निष्ठा
असल्याचे गोरठकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP district president Gorathekar leaves NCP AT Nanded