राष्ट्रवादीचे उपनेते जयदत्त क्षीरसागर मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर नाराजीमुळे पक्षापासून दुर होते. मधल्या काळात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी अधिकच संपर्क वाढविला होता. अगदी लोकसभा निवडणुकीच्या सर्वच प्रक्रीयांपासून दुर असलेल्या आमदार जयदत्त क्षीरसागर व बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी (ता. पाच) समर्थकांचा मेळावा घेऊन पक्षावर नाराजी व्यक्त केली.

बीड : नाराजीमुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेले आणि भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विजयाचे आवाहन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी (ता. सहा) रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेरेंना भेटले. त्यामुळे जिल्ह्यात नवी राजकीय समिकरणे तयार होण्याची शक्यता आहे. 

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर नाराजीमुळे पक्षापासून दुर होते. मधल्या काळात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी अधिकच संपर्क वाढविला होता. अगदी लोकसभा निवडणुकीच्या सर्वच प्रक्रीयांपासून दुर असलेल्या आमदार जयदत्त क्षीरसागर व बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी (ता. पाच) समर्थकांचा मेळावा घेऊन पक्षावर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन समर्थकांना केले. दुसऱ्याच दिवशी शनिवारी आमदार क्षीरसागर यांच्यासह बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही होते. या नेत्यांमध्ये आगामी राजकीय वाटचालीबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, युतीमध्ये बीड विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याचा आहे. त्यामुळे ते अलिकडे भाजपच्य संपर्कात अधिक असले तरी आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी मातोश्रीची पायरी चढल्याची माहिती आहे. दरम्यान, क्षीरसागरांच्या या खेळीमुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले असून जिल्ह्यात आता नवी राजकीय समिकरणे तयार होतील असे मानले जाते. 

Web Title: NCP leader Jaydatta Kshirsagar meet Shivsena chief Uddhav Thackeray