शरद पवार हे आमचे दैवत पण...; पाटील पिता-पुत्राचा निर्णय

तानाजी जाधवर
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

या मेळाव्याला माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उस्मानाबाद : शरद पवार हे आपले दैवत आहे, पुढेही राहिल. विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यानी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केले. ऱ्हद्यावर दगड ठेवुन हा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

या मेळाव्याला माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षापासुन जिल्ह्याच्या विकासासासाठी प्रयत्न करीत आहे. पण काही प्रश्न मार्गी लागत नाहीत हे वारंवार लक्षात येत होते. या प्रश्नाच्या बाबतीत अनेकवेळा शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो. गेल्या वीस वर्षापासुन प्रश्नाची सोडवणुक होत नसल्यावर काय करायचे असा सवालही आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना केला. 2009 मध्ये विधानसभेत पराभव होऊनही नाउमेद झालो नाही, विचित्र परिस्थितीमध्ये संघर्षाची भुमिका घेऊन आजवर लढलो आहे. पण आपल काही चुकत नसल्याचे जाणीव झाली मग काय चुकतय याचा विचार केला. तेव्हाच ऱ्हद्यावर दगड ठेवुन निर्णय घेण्याची आपल्यावर वेळ आल्याचेही पाटील यानी मान्य केले. कार्यकर्त्यांना काळजी करु नका तुम्हाला आजवर जशी वागणुक मिळाली तशीच वागणुक यापुढेही मिळणार असल्याचा विश्वास त्यानी यावेळी दिला. मतप्रवाह वेगळे असतील पण मी तुमच्यासोबत आहे.

मला आजवर तुम्ही साथ दिली आहे, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमची साथ अशीच राणा पाटील यांच्याबरोबर असावी अशी अपेक्षा माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Padmasingh Patil and Rana Jagjit Singh Patil joins BJP