क्षीरसागरांच्या पक्षांतराची समर्थकांतूनच चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

बीड - राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दिग्गज आणि पक्षाचे विधिमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांना पक्षातीलच नेते शह देण्याचे प्रयत्न करत असल्याने, ते अस्वस्थ आहेत; पण ते आता पक्षांतर करणार असून बोलणी अंतिम टप्प्यात असल्याच्या पोस्ट त्यांचेच समर्थक सोशल मीडियावर टाकत आहेत. 

पूर्वीपासून कॉंग्रेसी विचारसरणीच्या क्षीरसागरांच्या घरात अलीकडे काका-पुतण्यांत दुरावा निर्माण झाला आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात बंड करणाऱ्या पुतण्याला पक्षातील एका नेत्यासह काही ज्येष्ठांचेही बळ असल्याचे पंचायत समितीच्या "व्हिप' प्रकारावरून समोर आले. क्षीरसागरांचा ठाम नकार असतानाही जिल्हा परिषदेत आघाडीला सोबत घेतल्याने आपल्याला पक्षातूनच "शह' देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीत आपला समर्थक सदस्य गैरहजर ठेवून क्षीरसागरांनीही त्यांची अस्वस्थता दाखवून दिली. तेव्हापासून क्षीरसागरांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. आता तर त्यांचे समर्थकच आमदार जयदत्त क्षीरसागर लवकरच पक्षांतर करणार असून, बोलणी शेवटच्या टप्प्यात असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत आहेत. त्यांचे निकटतीय आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास विधाते अशा जबाबदार व्यक्तींकडून अशा पोस्ट टाकल्या जात असल्याने यामध्ये तथ्य वाटत आहे. 

Web Title: NCP MLA jaydatta kshirsagar