आधी उमेदवारी अन्‌ नंतर निलंबन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

लातूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आधी उमेदवारी देण्यात आली, पक्षाच्या वतीने एबी फॉर्मही देण्यात आले. पण नंतर ते चुकीने दिल्याचे कारण पुढे करीत पाच उमेदवारांना पक्षाने निलंबित केले आहे. असे असले तरी आता हे पाचही उमेदवार "घड्याळ' या याच चिन्हावर निवडणूक लढत आहेत. त्यामुळे प्रचारात मतदारांना सांगता सांगता पक्षाची मोठी अडचण झाली आहे. 

लातूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आधी उमेदवारी देण्यात आली, पक्षाच्या वतीने एबी फॉर्मही देण्यात आले. पण नंतर ते चुकीने दिल्याचे कारण पुढे करीत पाच उमेदवारांना पक्षाने निलंबित केले आहे. असे असले तरी आता हे पाचही उमेदवार "घड्याळ' या याच चिन्हावर निवडणूक लढत आहेत. त्यामुळे प्रचारात मतदारांना सांगता सांगता पक्षाची मोठी अडचण झाली आहे. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी होऊन दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी विचार करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची यादी जाहीर केली होती. त्या व्यतिरिक्त काही गण व गटात चुकीच्या पद्धतीने पक्षाचा एबी फॉर्म आणून दाखल करण्यात आला होता. त्यावर प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसने संबंधित निवडणूक अधिकाऱ्यास पत्र देऊन पक्षाचे एबी फॉर्म रद्द करावे, अशी विनंती केली होती. काही तांत्रिक अडचणींमुळे हे पत्र वेळेवर पोचू शकले नाही. म्हणून त्यांच्या अर्जासोबत पक्षाचे घड्याळ हे चिन्ह राहिले आहे. त्यानंतर जिल्ह्याचे प्रभारी जीवनराव गोरे व जिल्हाध्यक्षांनी या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचनाही कळविल्या होत्या. तरीही पक्षादेश धुडकावून काहींनी उमेदवारी ठेवली आहे. त्यात भातांगळी (ता. लातूर) जिल्हा परिषद गटातून पूजा साळुंके, बोरी पंचायत समिती गणातून स्वाती कदम, नळगीर जिल्हा परिषद गटातून व्यंकटराव पाटील अवलकोंडेकर, नळगीर पंचायत समिती गणातून लक्ष्मण उगिले, तांदुळजा पंचायत समिती गणातून इरफान शेख यांचा समावेश आहे. पक्षादेश न मानल्याने या सर्वांना पक्षांतून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे वरील सर्व ठिकाणी कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म न पाळल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे. 

आता कसली लढत? 
आघाडीच्या जागा वाटपानंतरही वरील ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने एबी फॉर्म दिल्याने पक्षाचे उमेदवार राहिले होते. गेल्या काही दिवसांपासून हे उमेदवार आमची मैत्रीपूर्ण लढत आहे असे सांगत होते. पण आता पक्षानेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे याला कसली लढत म्हणायची, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. याचा कोणाला फटका बसणार हे लवकरच कळणार आहे.

Web Title: NCP suspended five candidate