esakal | सेलूत शंभर खाटांच्या रूग्णालयाची गरज- सेलूसह पाच तालुक्यांतील रूग्ण घेतात उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेलू शहरात रेल्वे स्थानक असल्यामूळे या शहरात ये—जा करण्यासाठी नागरिकांना हे शहर सोयीचे आहे.तसेच शहराच्या पूर्वेस असलेल्या उपजिल्हा रूग्णालयाला पूरेशी जागाही उपलब्ध असल्यामुळेच या शहराला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे.सेलू

सेलूत शंभर खाटांच्या रूग्णालयाची गरज- सेलूसह पाच तालुक्यांतील रूग्ण घेतात उपचार

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू,(जिल्हा परभणी) : येथिल उपजिल्हा रूग्णालय अनेक वर्षापासून पन्नास खाटांचेच आहे. सेलू तालुक्याची संख्या व इतर पाच तालुक्यातील रूग्ण येथिल उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेण्यासाठी येत आहेत.रूग्णांची संख्या व तेथिल सुविधा, कर्मचारी संख्या पहाता या ठिकाणी शंभर खाटांचे रूग्णालय व्हावे अशी मागणी सेलूकरांतून होत आहे.

सेलू शहरात रेल्वे स्थानक असल्यामूळे या शहरात ये—जा करण्यासाठी नागरिकांना हे शहर सोयीचे आहे.तसेच शहराच्या पूर्वेस असलेल्या उपजिल्हा रूग्णालयाला पूरेशी जागाही उपलब्ध असल्यामुळेच या शहराला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे.

हेही वाचानांदेड : दत्तगडाच्या विकासासाठी आराखडा गरजेचा आहे, पालकमंत्री अशोक चव्हाण -

सेलू तालुक्याची लोकसंख्या एक लाख ६९,१७४ इतकी असून तालुक्या लगत असलेल्या परतूर,मंठा,जिंतूर,पाथरी व मानवत या पाच तालुक्यातूनही बहूतांश रूग्ण केवळ उपचार घेण्यासाठी येथिल उपजिल्हा रूग्णालयात येतात. सद्य:स्थितीत येथिल उपजिल्हा रूग्णालय पन्नास खाटांचे असून मंजूर पदे  २९ आहेत.या रूग्णालयात दरमहा शंभर ते दिडशे पर्यंत स्वाभाविक प्रसुती तर पंधरा ते वीस सिझेरियन प्रसुती होतात.तसेच बाह्य रूग्ण विभागातही रूग्णांची संख्या भरपूर असते.त्यामुळे तालुक्यासह इतर पाच तालुक्यांची जवळपास पाच लाख २१ हजार इतक्या लोकसंख्येला गुणात्मक सेवा मिळण्यासाठी येथिल उपजिल्हा रूग्णालय शंभर खाटांचे होणे गरजेचे आहे.शंभर खाटांचे रूग्णालय झाल्यास या रूग्णालयातील नविन ६८ कर्मचारी पदे मंजूर होतील.व अद्यावत सुविधाही रूग्णांना मिळतील अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

येथिल उपजिल्हा रुग्णालयात शंभर खाटा मंजूर झाल्या तर डॉक्टर्स व स्टाफची संख्या वाढेल तसेच विशेष तज्ञ ही  वाढतील आणि रुग्णांना चांगल्या प्रतीची सेवा मिळण्यास मदत होईल.तसेच यासाठी नविन इमारत आणि साहित्य सामुग्री सुद्धा येईल.

- डाॅ.संजय हरबडे, वैद्यकिय अधिक्षक,उपजिल्हा रूग्णालय, सेलू जि. परभणी

.संपादन-  प्रल्हाद कांबळे

loading image