जैवविविधता जपण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज

प्रमोद चौधरी
गुरुवार, 26 मार्च 2020

जगाच्या पाठीवरची वाढती लोकसंख्या आणि प्रत्येकाला आर्थिक महासत्ता बनण्याचा लागलेला ध्यास, हेच जैविक विविधतेच्या ऱ्हासाचे मूळ कारण आहे.

नांदेड : जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. परंतु, अलीकडे झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामुहिकरीत्या लुप्त होताना दिसत आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचाही नाश होत आहे. पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाडे लावली जायची. परंतु, सिमेंट कॉंक्रिटीकरणामुळे झाडे लावणेच आज दुरापास्त झाले आहे. परिणामी जैवविविधता धोक्यात आली आहे. त्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची आज गरज निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राची जैवविविधता ही नैसर्गिक समृद्धीची खाण आहे. आपल्याच हितासाठी, निसर्गात आढळणाऱ्या या प्रत्येक जीव-जंतू, प्राणी आणि वनस्पतींच्या विविध जाती-प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. जंगले, कुरणे, शेती, जलप्रदेश, नद्या यांमधून सजिवांच्या विविध जाती, त्यामधील जनुकीय विविधतेसह जपलेला असतो. परंतु, हाच जैवविविधतेचा वारसा, ही संपत्ती आज धोक्यात आल्याने विविध आजारांचा फैलाव होताना दिसत आहे. एकंदरीतच जगाच्या पाठीवरची वाढती लोकसंख्या आणि प्रत्येकाला आर्थिक महासत्ता बनण्याचा लागलेला ध्यास, हेच जैविक विविधतेच्या ऱ्हासाचे मूळ कारण आहे.

हेही वाचा - शासकिय आदेश धुडकावणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

विविधता टिकविण्याचा निर्णय
आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले की, दर २० मिनिटाला एक प्रजाती नाहिशी होत आहे. यासाठी आपण आपल्या स्तरावरून ही जैवविविधता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय जैवविविधता परिषदेत करार केला. यामध्ये पृथ्वीवरील सजीव सृष्टीत आढळणारे विविधता टिकवून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धोरणात्मक आराखडा व उद्दिष्ट्ये

  1. सरकार व समाज यांची विचारधारा यांच्यात सांगड घालून जैवविविधतेच्या ऱ्हासाची मूळ कारणे शोधणे
  2. जैवविविधतेवरील प्रत्यक्ष ताण कमी करून शाश्वत वापराला प्रोत्साहन देणे
  3. परिसंस्था प्रजाती आणि जणुकीय विविधतेला संरक्षण देऊन जैवविविधतेची स्थिती सुधारणे
  4. जैवविविधता आणि परिसंस्थेचा लाभ सर्वांना मिळवून देणे.
  5. सर्वसमावेशक निधीजन ज्ञानाचे व्यवस्थापन व क्षमता विकासाद्वारे अमलबजावणीत सुधार करणे आदी बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे.

हे देखील वाचाच - Video : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका

 

नागरिकांनी लक्ष देण्याची गरज
जैवविविधता बाबत आपण सतर्क राहिलो नाही तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. विविधता तर कोसो दूर जाईल. जैवविविधतेचे रक्षण कसे करता येईल, याकडे आता नागरिकांनी लक्ष द्यायला पाहिजे.
- डॉ. सदाशिव पळसकर, नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need for Community Efforts to Preserve Biodiversity Nanded News