esakal | फळबागेत साचलेल्या पाण्याच्या निचऱ्याची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

फळबागेत साचलेले पावसाचे पाणी.

फळबागेत साचलेल्या पाण्याच्या निचऱ्याची गरज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गेल्या आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. फळबागातील झाडाच्या तुटलेल्या फांद्या आणि साचलेले पाणी बागेच्या बाहेर काढण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा: ‘मराठी भाषा, साहित्याचा मराठवाडा आधारवड’

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामूळे डाळींब, मोसंबी, लिंबू, केळी या फळाबागा तसेच भाजीपाला पिकांमध्ये पाणी साचले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तसेच हवेतील आर्द्रता व ढगाळ वातावरणामुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. तर मोसंबी, संत्रा बागेत फळगळीसह फांद्या मोडल्या आहेत. या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के . डाखोरे यांनी सांगीतले, ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केलेल्या कृषि हवामान आधारीत शिफारशीनुसार साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसामूळे केळी बागेत पडलेली घडे गोळा करून नष्ट करावीत.

हेही वाचा: पाटबंधारे विभागाच्या बेजबाबदारपणामुळेच पुराचे संकट

मोडलेली झाडे शेताबाहेर टाकावीत. केळी बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम ५० डब्ल्यू पी १० ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल १० टक्के ईसी १० मिलिलीटर प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. संत्रा, मोसंबी बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसामूळे पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. फळझाडांच्या मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. लिंबूवर्गीय फळबागेत कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम आणि स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. डाळींब बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. डाळींब फळबागेत कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम आणि स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.

हेही वाचा: अतिवृष्टीसाठी मुख्यमंत्री देतील वेगळा निधी : अब्दुल सत्तार

भाजीपाला पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसामूळे प्रादूर्भावग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करावी. मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे फुल पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. येत्या काळात गणपती व गौरी उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावे असे आवाहन केले आहे.

loading image
go to top