

Maharashtra Drought Relief Neelam Gorhe Reviews Crop Damage Water Shortage and Fodder Crisis in Udgir Latur District
sakal
-युवराज धोतरे
उदगीर, (जि.लातुर) : उदगीर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या दुष्काळी मदतीपासून वंचित राहू दिले जाणार नाही. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उदगीर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल सादर करणार, शासनाच्या दुष्काळी शासन निर्णयानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करून घेणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.