

BHMS Student Assault Case Begins At NEET Coaching Class Accused Threatened To Make Private Photos Viral For Two Years
sakal
बीड : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या (बीएचएमएस) एका तरुणीचा सतत पा ठलाग करून, तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची आणि अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला. शेख मुस्सवीर शेख वशीम (रा. मकसूर कॉलनी, बीड) असे संशयिताचे नाव आहे.