esakal | लातुरात परीक्षा विद्यार्थ्यांची अन् धावपळ पालकांची, परीक्षा झाली ‘नीट’
sakal

बोलून बातमी शोधा

NEET Exam

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १३) ‘नीट’ची परीक्षा नीट झाली. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी राहिली. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची होती; पण यात पालकांची मात्र मोठी धावपळ झाली.

लातुरात परीक्षा विद्यार्थ्यांची अन् धावपळ पालकांची, परीक्षा झाली ‘नीट’

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १३) ‘नीट’ची परीक्षा नीट झाली. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी राहिली. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची होती; पण यात पालकांची मात्र मोठी धावपळ झाली. एकीकडे परीक्षेचा ताण, तर दुसरीकडे कोरोनाची भीती अशा द्विधा मनस्थितीत विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले.


देशभरात मार्चपासून कोरोनाचे सावट सुरू आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ‘नीट’ परीक्षा कधी होणार याकडे पालकांचेही लक्ष लागले होते. साधारणतः मेमध्ये होणारी ही परीक्षा रविवारी झाली. लातूर जिल्ह्यात १६ हजार विद्यार्थी प्रविष्ठ होते. यासाठी ४३ परीक्षा केंद्रे होती. प्रत्येक केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दिलासा न मिळाल्यास रस्त्यावर उतरू, मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला सात दिवसांचा...

गेल्या दोन दिवसांपासूनच बाहेरगावी असलेले विद्यार्थी व पालक लातुरात दाखल झाले होते. अनेक विद्यार्थी व पालक रविवारी सकाळी खासगी वाहने करीत शहरात दाखल झाली होती. त्यामुळे रविवार सुटीचा दिवस असतानाही रस्त्यावर नुसती वाहनेच दिसून येत होती. विद्यार्थ्यांसोबत पालकांची मोठी धावपळ होताना दिसत होती. आपल्या पाल्याचे ॲडमिट कार्ड व्यवस्थित आहे का?, फोटो लावला आहे का? इतर साहित्य सोबत घेतले आहे का? हे सर्व पालक पाहत होते.

दिले टायमिंग स्लॉट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना टायमिंग स्लॉट देण्यात आले होते. सकाळी अकरापासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे सकाळपासूनच प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालकांची तोबा गर्दी दिसून आली. त्यात येथील दयानंद शिक्षण संस्थेत चार परीक्षा केंद्रे होती. त्यामुळे या केंद्रांवर इतर केंद्रांपेक्षा अधिक गर्दी राहिली. यात शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करण्याचेही विद्यार्थी विसरून गेले होते. केंद्राच्यावतीने सूचनाही दिल्या जात होत्या; पण परीक्षा केंद्रात कधी जाईन, हीच विद्यार्थ्यांना उत्सुक्ता होती.

वाहनधारकांनो सावधान ! कर्जाचा बोजा उतरविण्याकडे करु नका दुर्लक्ष, नाहीतर '...

अत्यंत चांगल्या उपाय योजना
सर्वच परीक्षा केंद्रात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परीक्षा केंद्रात जातानाच विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. मास्क, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायजर आहे का हे पाहिले जात होते. आतमध्ये विद्यार्थ्यांचे तापही तपासण्यात येत होता. शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करीत त्यांची बसण्याची व्यवस्था केली होती. कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

संपादन - गणेश पिटेकर