लातूरच्या विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईचे परीक्षा केंद्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

लातूर - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या देशपातळीवरील राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेने (नीट) येथील विद्यार्थ्यांना यंदा झटका दिला आहे. येथे नीट परीक्षेचे केंद्र मंजूर होऊनही या केंद्राची पसंती देणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मुंबई व पुण्यासह दूरच्या केंद्राचा रस्ता दाखवला आहे. शहरातील केंद्रावर केवळ मुलींची सोय करण्यात आली असून बोटावर मोजण्याएवढ्याच मुलांना लातूर केंद्र मिळाले आहे.

लातूर पॅटर्नमुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने येथे आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने यंदा येथे नीट परीक्षा केंद्र मंजूर केले. मात्र, त्याचा फायदा केवळ मुलींनाच झाल्याचे दिसत आहे.

Web Title: neet exam medical latur student pune mumbai exam center