‘नीट’मध्ये लागला विद्यार्थ्यांचा कस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

औरंगाबाद - वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रविवारी (ता. सहा ) पार पडलेल्या ‘सीबीएसई’च्या ‘नीट’ परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा चांगलाच कस लागला. परीक्षेच्या नव्या नियमांचाही विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्तापही सहन करावा लागला.

एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्व परीक्षा ‘नीट’ अर्थात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा रविवारी सकाळी १० ते १ या वेळेत शहरातील ३८ परीक्षा केंद्रांवर पार पडली. यासाठी सकाळी सात वाजेपासूनच परीक्षा केंद्रावर गर्दी पहायला मिळाली. 

बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यात मोठी होती. परीक्षेसाठी सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील बहुतांश जणांनी परीक्षा दिली.

परीक्षेसाठी दिलेल्या सूचना अनेकांनी व्यवस्थित न वाचल्याने ऐनवेळी अनेकांची तारांबळ उडाली. फुल बाह्याचे शर्ट, कॉलर असलेले शर्ट घालून येण्यास मनाई असल्याने बाह्या फाडून परीक्षेला सामोरे जावे लागले. एनसीआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधील अभ्यासक्रमावरच आधारित प्रश्न विचारण्यात आले होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

दरम्यान, एमबीबीएस आणि दंत वैद्यकीयसह सहा अभ्यासक्रमाच्या जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ जून २०१८ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: NEET Exam Student