नेकनूरच्या आठवडे बाजारातून पळविली पैशाची बॅग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

दुकान उघडत असताना चोरट्यांनी सराफा व्यापाऱ्याची पैशाची बॅग पळविल्याची घटना रविवारी (ता. 8) येथील आठवडे बाजारात घडली.

नेकनूर (जि. बीड) - दुकान उघडत असताना चोरट्यांनी सराफा व्यापाऱ्याची पैशाची बॅग पळविल्याची घटना रविवारी (ता. 8) येथील आठवडे बाजारात घडली.
 
विवेक रोटे यांचे नेकनूर गावातील मुख्य रस्त्यावर सोने चांदीचे दुकान आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता रोटे आपले दुकान उघडत होते. शटर उघडण्यासाठी त्यांनी हातातील पैशाची पिशवी खाली ठेवली. यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या चोरट्यांनी ही बॅग पळविली.

गेल्या आठवड्यात पाटोद्यात एका व्यापाऱ्याची पावणेदोन लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळविली होती. आता नेकनूरच्या आठवडे बाजारातही हा प्रकार घडला आहे. आडस, दिंद्रूड व विडा येथील आठवडे बाजारांत तर मोबाईल चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत.

Web Title: in Neknur market theft of money bag