या आहेत मराठवाड्यातील लक्षवेधी लढती, परळीत हाय हाय हॉल्टेज | Election Results 2019

Dhananjay Munde, Pankaja Munde
Dhananjay Munde, Pankaja Munde

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, मराठवाड्यातील प्रशासकीय व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानानंतर मिळालेल्या तीन दिवसांच्या निवांतपणात दावे-प्रतिदावे, आकड्यांचा खेळ आणि अंदाज बांधण्यात व्यस्त झालेल्या उमेदवारांच्या पदरात नेमके काय पडते, हे आता कळणार आहे. मराठवाड्यातील अनेक दिग्गजांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष असेल. 

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील 46 मतदारसंघांत सरासरी 65.70 टक्के मतदान झाले होते. 676 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंदिस्त झाले. मतदानादिवशी अनेक जिल्ह्यांत पाऊस होता, तसा तो नंतरही मुक्कामी आहे. मतदान झाल्यानंतर भिरभिरत्या पावलांना विश्रांती मिळाली; पण आकडेमोड, कार्यकर्त्यांकडून अंदाज घेणे, दावे-प्रतिदाव्यांत उमेदवार, पक्षीय पदाधिकारी गुंतले. आम्हीच विजयी होणार असल्याचे प्रमुख पक्षांचे उमेदवार सांगत असले, तरी मतदारराजाने भरभरून माप कुणाच्या पारड्यात टाकले आहे, हे मतमोजणीनंतरच कळणार आहे. 

पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, अतुल सावे, जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत हे मराठवाड्यातील मंत्री रिंगणात आहेत. त्याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे दिग्गजही नशीब अजमावीत आहेत. मुंडे भावा-बहिणीतील लढतीसह लातूरला लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित आणि धीरज हे बंधू, बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे काका-पुतणे यांच्यात लक्षवेधी लढती होत आहेत. निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) आणि अशोक पाटील निलंगेकर (कॉंग्रेस) हेही आमनेसामने आहेत. त्याशिवाय पक्षांतर केलेले आणि रिंगणात असलेल्यांबद्दलही उत्सुकता आहे. त्यात सिल्लोड मतदारसंघातील कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेलेले अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले, तुळजापुरातून लढत असलेले उस्मानाबादचे राणाजगजितसिंह आदींचा समावेश आहे. 
 

चुरशीच्या लढती : मराठवाडा 

  • भोकर - अशोक चव्हाण (कॉंग्रेस)- बापूसाहेब देशमुख गोरटेकर (भाजप) 
  • नांदेड दक्षिण - राजश्री पाटील (शिवसेना)- मोहम हंबर्डे (कॉंग्रेस)- फारुक अहमद (वंचित) साबेर चाऊस (एमआयएम)- दिलीप कंदपूर्ते (भाजप बंडखोर,अपक्ष) 
  • नायगाव - राजेश पवार (भाजप)- वसंत चव्हाण (कॉंग्रेस)- मारोतराव कवळे गुरुजी (वंचित) 
  • गंगाखेड - मधुसुदन केंद्रे (राष्ट्रवादी)- विशाल कदम (शिवसेना) - रत्नाकर गुट्टे (रासप)- सीताराम घनदाट (अपक्ष)- संतोष मुरकुटे (अपक्ष). 
  • लातूर शहर - अमित देशमुख (कॉंग्रेस)- शैलेश लाहोटी (भाजप) 
  • अहमदपूर - विनायकराव पाटील (भाजप)- बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी) 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com