अहमदपूर : आई वडीलांचे छत्र हरवलेल्या नेत्राची दहावीच्या परिक्षेत उत्तुंग भरारी..

प्रा. रत्नाकर नळेगांवकर
Wednesday, 29 July 2020

तिरुपतीला जाताना गाडीला अपघात झाला. यात आई वडील आणि भावाचे निधन झाले. त्यानंतर तीचा प्रवास सुरु झाला. आजोळी मायेचा आधार मिळाला. त्याचे तिने चीज केले. दहावीच्या परिक्षेत चांगले यश मिळविले. 

अहमदपूर (लातूर) : आई वडीलांचे छत्र हरवलेल्या नेत्रा सुबोध वाघमारे या विद्यार्थीनीने शालांन्त प्रमाणपत्र परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून त्यामधे शहरातील नेत्रा सुबोध वाघमारे या विद्यार्थीनीने ९७.४० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

सन २०१३ मधे जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेले सुबोध वाघमारे हे आपल्या कुटुंबासह तिरूपती दर्शनाला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्या मधे स्वतः, पत्नी व लहान मुलगा मयत झाला. तर नेत्रा वाघमारे ही जखमी झाली होती. त्या वेळी इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेली नेत्रा ही पुढे आजोळी आजी आजोबाकडे शिक्षणासाठी राहीली. आई वडीलांचे छत्र हरवलेल्या नेत्राने आलेल्या दुखाला दोन हात करून इयत्ता दहावी परीक्षेत यश संपादन केले. या यशाचे श्रेय ती आजी आजोबांना देत आहे. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम  

माझ्या सारखे आई वडीलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये .विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी व अभ्यासात सातत्याने यश मिळते. शिक्षणाकडे लक्ष देऊन मोठा अधिकारी होण्याची तयारी ठेवावी. जेणे करून आपल्या आई वडीलांचे स्वप्नं साकार होतील.
नेत्रा वाघमारे, अहमदपूर.    

Edited By pratap Awachar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netra get 98 percentage in ssc exam she face many problem