खरीपीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांचा आधुनिक 'बीबीएफ' पेरणी यंत्राचा वापर

इतर बदला बरोबरच शेतीनेही कात टाकली असून शेतकरी वर्गही आधुनिक तंत्रज्ञानाचा, साधनांचा वापर करत आहे
perani
peraniperani

परळी (बीड): तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व व मॉन्सूनचे दणक्यात आगमन झाले असून मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने मृगी पेरणीला सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कूस बदलला असून पारंपरिक पद्धतीने पेरणी न करता आधुनिक बीबीएफ (BBF) पेरणी यंत्राचा वापर करुन वेळेसह खर्चाचीही बचत केली आहे. पूर्वी पेरणी म्हटली की, शेतकऱ्यांची लगीनघाई असे. शेतकऱ्याची संपूर्ण पेरणी होईपर्यंत लगबग सुरू असायची. आता मात्र, काळ बदलला आहे. आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाल्याने सर्वत्र मोठा बदल दिसून येत आहे.

पेरणीयंत्र
पेरणीयंत्र

इतर बदला बरोबरच शेतीनेही कात टाकली असून शेतकरी वर्गही आधुनिक तंत्रज्ञानाचा, साधनांचा वापर करत आहे. आजपर्यंत ट्रॅक्टरवरचे विविध शेतीसाठीची साधने बाजारात उपलब्ध झाली होती. पण आता याबरोबरच बैलांची मेहनत कमी करण्यासाठी व मजुरांची वाणवा होत असल्याने मजुरांची संख्या कमी करण्याची साधने बाजारात उपलब्ध झाली आहेत.

perani
धानुरी ठरतंय कोरोनाचे 'हॉटस्पॉट'; दोन दिवसांत तब्बल ५३ रुग्ण

तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग या आधुनिक साधनांचा वापर करत आहेत. गाढे पिंपळगाव येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग गंगणे यांनी ट्रँक्टरवर चालणारे बीबीएफ पेरणी यंत्र खरेदी केले असून यासाठी त्यांना ४७ हजार रुपये खर्च आला आहे. सुरूवातीला हा खर्च जरी जास्त वाटत असला तरी पेरणीसाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या यामुळे कमी होत आहे. हे यंत्र पेरणी झाल्यानंतर भाड्याने पण देता येते. एकरी एक हजार रुपये मिळतात. दिवसभरात साधारणपणे ८ ते १० एकर बियाणे पेरणी करता येते.

पेरणी करताना
पेरणी करताना

साधारणपणे पारंपरिक पद्धतीने पेरणी करण्यासाठी खतासाठी एक, बियाण्यांसाठी एक, बैल चालवण्यासाठी एक असे मजूर लागत असत पण या यंत्रामुळे मजुरांविना संपूर्ण पेरणी करता येते. यामुळे वेळ व खर्चही कमी लागत असल्याचे पांडुरंग गंगणे यांनी सांगितले. या यंत्रामध्ये दोन भाग असून एका भागामध्ये बी-बियाणे २५ किलो भरता येते तर दुसऱ्या भागात खते ५० किलो टाकता येतात. या यंत्राद्वारे दिवसभरात ८ ते १० एकर क्षेत्रातील पेरणी करता येते. बैलावर पेरणी करण्यासाठी एकरी अंदाजे १ हजार ५०० ते २ हजार रुपये खर्च येतो. या यंत्राद्वारे कमी खर्चात, कमी वेळेत जास्तीत जास्त पेरणी करता येते. कृषी विभागानेही या यंत्राची शिफारस केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com