नवविवाहितेच्या पित्याचा मंडपातच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

रहाटगाव - सकाळपासून लग्नाची धामधूम सुरू झाली. कलवऱ्यांनी हसत खेळत अंगाला हळद लावली. मुंडावळ्या, बाशिंग बांधून विवाहासाठी वधू-वरांना सजवले. ऐन शुभमंगल सावधान म्हणण्याची घटिका समीप आली. वऱ्हाडी मंडळी मंडपात आली. अक्षतांचे वाटप करण्यात आले अन्‌ वधूच्या पित्याला हृदयविकाराचा झटका येऊन प्राणज्योत मालवल्याची घटना रहाटगाव (ता. पैठण) येथे सोमवारी (ता. सात) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. पांडुरंग पाराजी वीर (वय ५०) असे मृताचे नाव आहे. 

येथील पांडुरंग वीर यांची द्वितीय कन्या प्रियांका हिच्या विवाहाची धामधूम सुरू होऊन अवघे गाव जमा झाले. वऱ्हाडी मंडळी आली; पण... मंडपातच अचानकपणे नवरीच्या पित्याला हृदयविकाराचा झटका आला अन्‌ त्यांचा मंडपातच मृत्यू झाला. मात्र, वधूला या घटनेची माहिती न देता सरपंच बबन मिसाळ, उपसरपंच कैलास फासाटे, निजाम शेख, श्‍याम फासाटे यांनी तातडीने खासगी वाहनाने वीर यांना पैठणला हलविले. वधू वगळता इतरांना याची कल्पना होती. मोठ्या जड अंतःकरणाने अक्षता टाकण्यात येऊन नवरीला सासरी पाठविण्यात आले. लग्नानंतरची सुखी संसाराची स्वप्न पाहत या वधू-वरांनी एकमेकांना मिठाई खाऊ घातली. या सुखद कार्यक्रमाचे छायाचित्रण करण्यात आले. त्यानंतर लग्नासाठी आलेले पाहुणे आनंदाने परतीच्या प्रवासासाठी निघाले. नातेवाईक व ग्रामस्थांनी मुलीची पाठवणी केली. याप्रसंगी उपस्थितांचे डोळे पाण्याने डबडबले होते.

Web Title: new bride father death by heart attack