Good news : मराठवाड्यातील या मार्गावर धावणार नवीन विशेष रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

ही नवीन विशेष गाडी ता. 3 ते 30 सप्टेंबरदरम्यान चालविण्यात येणार आहे.

औरंगाबाद / नांदेड - दक्षिण-मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नांदेड-औरंगाबाद-नांदेड अशी नवीन विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे.

ही नवीन विशेष गाडी ता. 3 ते 30 सप्टेंबरदरम्यान चालविण्यात येणार आहे. ही गाडी रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. ती नांदेड येथून सकाळी आठ वाजता सुटेल. या गाडीला पूर्णा, परभणी, मानवतरोड, सेलू, परतूर, रांजणी, जालना, बदनापूर, मुकुंदवाडी येथे थांबे आहेत.

ही गाडी औरंगाबाद येथे दुपारी 12.45 वाजता पोचेल. परतीच्या प्रवासात ती औरंगाबाद येथून सायंकाळी 6.10 वाजता सुटेल आणि नांदेड येथे रात्री 11 वाजता पोचेल. या गाडीस आठ डब्बे असतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New special train to Nanded-Aurangabad-Nanded