तुम्ही खाताय ते तेल शुद्ध आहे का?, अशी ओळखा भेसळ

अतुल पाटील
रविवार, 29 सप्टेंबर 2019

औरंगाबाद - अधिक पैसा कमविण्याच्या हव्यासातून खाद्यपदार्थांत मोठी भेसळ होत असते. यात खाद्यतेलातील भेसळ ही थायरॉईडसारख्या आजारांना निमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे. इतर खाद्यतेलांच्या तुलनेत महाग असलेल्या करडईच्या तेलात भेसळीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. याचमुळे एकाच शहरात किलोमागे तब्बल 60
ते 70 रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे तेल घेताना ते खरच शुद्ध आहे का, याची खात्री करूनच ते घेणे गरजेचे झाले आहे.

औरंगाबाद - अधिक पैसा कमविण्याच्या हव्यासातून खाद्यपदार्थांत मोठी भेसळ होत असते. यात खाद्यतेलातील भेसळ ही थायरॉईडसारख्या आजारांना निमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे. इतर खाद्यतेलांच्या तुलनेत महाग असलेल्या करडईच्या तेलात भेसळीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. याचमुळे एकाच शहरात किलोमागे तब्बल 60
ते 70 रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे तेल घेताना ते खरच शुद्ध आहे का, याची खात्री करूनच ते घेणे गरजेचे झाले आहे.

करडई, शेंगदाणा, जवस, सूर्यफूल, सोयाबीन, खोबरेल, तीळ, सरकी, पामतेल आणि आता राईसब्रॅन तेल खाद्यपदार्थ्यांमध्ये वापरले जाते. यात सर्वांत महाग करडई, शेंगदाणा, जवस तेल आहे. करडईच्या एक लिटर तेलामध्ये अर्ध्या लिटरपेक्षा अधिक सोयाबीन, सूर्यफूल तेल वापरले जात आहे. यामुळे दुकानदाराला तब्बल 170 ते 185 रुपये लिटरचे तेल 120 रुपयांपर्यंत
गिऱ्हाइकांना विकता येते. शहरातील वेगवेगळ्या भागात याच तेलाच्या बाबतीत ही तफावत पाहायला मिळते. शिवाय वर्षात एकच पीक घेता येत असल्यानेही उत्पादन कमी होऊन दर वाढत आहेत. 

शेंगदाणा तेलातही भेसळ होते. महाग तेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारनेच भेसळीसाठी मर्यादित परवानगी दिली आहे. बंद पाकीट किंवा कॅनमधील तेलासाठी नियमांचे पालन होते; मात्र होलसेल विक्रेत्यांकडून भेसळीचे प्रमाण वाढत असल्याचे किमतीतील तफावतीवरूनच लक्षात येत आहे. 
 

भेसळ ओळखावी कशी? 
भेसळ महाग तेलात म्हणजे करडई आणि शेंगदाणा तेलात अधिक होते. दोन्ही तेल जाड आणि गडद रंगाचे असते. रंग लाल-पिवळा असतो. सुगंधावरून आणि तेल चाखल्यानंतरही भेसळ ओळखता येऊ शकते. नैसर्गिक तेलात काही तळले तर, त्यात फेस अधिक होतो. तुलनेने भेसळीच्या तेलात फेस होत नाही.  

थायरॉईडचा धोका 
तेलविक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीन तेलाच्या वापरामुळे थायरॉईडचा आजार वाढताना दिसत आहे. काहींना फॅट वाढवायची असते ते शेंगदाणा तेलाला पसंती देतात तर, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करडई तेल वापरतात. शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी जवस तेल वापरणाऱ्यांचे प्रमाण लोकांमध्ये आहे. याचाच लाभ दुकानदार घेतात. कमी पैशात तेल देऊन गिऱ्हाईक टिकवण्यासाठी तर, काहीजण अधिक पैसे कमाविण्यासाठी अशी भेसळ करतात. आरोग्याबाबत लोक जागृत होत असून, तेलातील पाणी आणि चोथा काढण्यासाठी केवळ फिल्टर केलेले तेल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 

करडई हृदयासाठीही लाभदायक आहे. खाद्यपदार्थांत भेसळ व्हायलाच नको. दर किंवा आरोग्याबाबत लोक जागरूक झाले असून, त्यांची भावना दुखावण्याचे काम कोणी करू नये. 
- विनायक कसबेकर, तेल विक्रेता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newa about Tincture of edible oil