नकोशीला टाकले; कुत्र्यांनी ओरबाडले!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - "ती'चे भविष्य काय असेल याचा कसलाच विचार न करणाऱ्या जन्मदात्यांनी नकोशी असलेल्या "ती'ला निर्दयीपणे झुडपांत सोडून पळ काढला. कुत्र्यांच्या तावडीत सापडून ती ओरबाडली गेली. तिच्या देहाचे लचके तोडल्याचे दिसल्यानंतर नागरिकांनी धावाधाव केली; पण तोपर्यंत ती या जगातून गेली होती.

अत्यंत संपापजनक आणि हृदयद्रावक अशा दोन्ही भावना एकाच वेळी व्यक्त व्हाव्यात आणि अंगावर टचकन काटा येऊन काळीजही पिळवटून निघावे, अशी ही घटना शहाशोक्त दर्ग्याच्या पुलाखाली मंगळवारी (ता. 27) उघडकीस आली. नऊ महिने पोटात बाळ ठेवल्यानंतर जन्म होताच दुसऱ्याच दिवशी त्याला वाऱ्यावर सोडून दिल्याचाच हा प्रकार आहे. अवघे दोन दिवस आयुष्य मिळालेल्या या नकोशीला मंगळवारी पहाटे जन्मदात्याने अथवा त्यांच्या संमतीने महूनगर येथील शहाशोक्त दर्ग्याच्या पुलाखाली झुडपांमध्ये टाकून देण्यात आले होते. ममत्त्वापासून दूर लोटली गेलेली "ती' कुत्र्यांच्या तावडीत सापडली. कुत्र्यांनी तिच्या देहाचे लचके तोडले. यात ती गतप्राण झाली.

ही बाब नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला कळविले. तेथील पोलिसांनी सातारा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल आडे, सहायक फौजदार सुभाष भोसले, पवार, हवालदार ठोंबरे, ढकाणे घटनास्थळी पोचले. त्यांनी त्याच अवस्थेत मुलीला घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सातारा पोलिस ठाण्यात झाली. तपास सहायक फौजदार सुभाष भोसले करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com