दोन दुचाकींच्या धडकेत युवक ठार

उमरगा : दोन्ही दुचाकींची झालेली अवस्था.
उमरगा : दोन्ही दुचाकींची झालेली अवस्था.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाला. तर एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. सोमवारी (ता. 27) दुपारी सव्वातीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर दत्त कॉलनीकडे वळणाऱ्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली.

तालुक्‍यातील नागराळ (गुंजोटी) येथील विनायक प्रभाकर गावकरे (वय 55) हे दुचाकीने (एमएच- 13, बीएस- 4683) जात होते. याच दरम्यान भुसणी (ता. उमरगा) येथील शिवराज भीमाशंकर व्होनाजे (वय 25) हा युवक दुचाकीने (एमएच- 25, डब्ल्यू- 4588) समोरून येत होता. दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात शिवराजच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्याना उपचारासाठी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यानच त्याची प्राणज्योत मालवली. तर विनायक गावकरे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

मृत युवक गावातच शेती करीत होता, तर जखमी विनायक हेही शेतीव्यवसाय करतात. दरम्यान, अपघातस्थळी पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, हवालदार श्री. शिंदे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com