कन्हैयाकुमार यांचा आज शहरात रोड शो

अनिल जमधडे
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद,  : भारतीय कम्युनिस्ट पक्ष डावी लोकशाही आघाडीच्या प्रचारासाठी जेएनयू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता डॉ. कन्हैयाकुमार यांचा गुरुवारी (ता. सोळा) सायंकाळी चार वाजता रोड शो होणार आहे. 

औरंगाबाद मध्यचे उमेदवार ऍड. अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ डॉ. कन्हैयाकुमार हे शहरात येत आहे. शहरातील चांदणे चौक, चेलीपुरा, मंजूरपुरा, सिटी चौक, जुनाबाजार, भडकलगेट मार्गे रोड शोने ते आमखास मैदान येथे जाहीर सभेसाठी पोचणार आहेत.

यावेळी भाकपचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो आणि डॉ. राम बाहेती यांच्यासह डाव्या आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. सहभागाचे आवाहन ऍड. मनोहर टाकसाळ, अशपाक सलामी, डॉ, समाधान इंगळे, बुद्धप्रिय कबीर, भास्कर लहाने, मधुकर खिल्लारे, एस. जी. शुत्तरी, तारा बनसोडे, किरणराज पंडित, सुभाष साबळे, प्रवीण घटविसावे, विकास गायकवाड, वसुधा कल्याणकर, कैलास कांबळे मनीषा भोळे यांनी केले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about airport