AMC : पाणीपुरवठा विभागात काम नको रे बाबा...

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - महापालिकेच्या अनेक विभागांत अधिकारी वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसले असून, त्यांच्या इतर विभागात बदल्या करण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. अभियंत्यांना त्यांच्या मर्जीनुसार विभाग दिले जाणार आहेत. त्यामुळे आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांची इच्छा जाणून घेतली. त्यावेळी पाणीपुरवठा विभाग नको रे बाबा... असाच सूर सर्वांच्या तोंडून निघाला. नगररचना कर आकारणी विभागाची अनेकांनी मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापालिकेच्या काही विभागांत अधिकारी अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत. त्यांच्या आता बदल्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी (ता.11) सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात उपअभियंते, शाखा अभियंते, कनिष्ठ अभियंते, वॉर्ड अभियंत्यांची बैठक घेतली. यावेळी कोण किती वर्षांपासून एकाच विभागात काम करत आहे, याची माहिती आयुक्तांनी घेतली. सेवानिवृत्तीजवळ आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार काम करण्याची संधी दिली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले; मात्र अधिकाऱ्यांनी नगररचना, कर आणि बांधकाम विभागात काम करणाऱ्या अभियंत्यांनी आमच्या बदल्या केल्या जाऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली. 

वर्षानुवर्षे एकाच विभागात काम 
पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या अभियंत्यांनी कैफियत मांडली. पाणीपुरवठा विभागात अभियंता रुजू झाला तर तो त्याच विभागातून सेवानिवृत्त होतो. या विभागातील अभियंत्यांच्या इतर विभागात कधीही बदल्या झालेल्या नाहीत. साहेब आमच्यासह वरिष्ठ मंडळी या विभागात काम करून थकले आहेत. आम्ही स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली; मात्र आयुष्यभर पाणीपुरवठा विभागात काम करावे लागत आहे, असे अभियंत्यांचे म्हणणे होते. नगररचना, कर, बांधकाम विभागात आम्हीही आनंदाने काम करू शकतो. सेवानिवृत्त होण्यास पाच ते सात महिने राहिले आहेत, अशांची तरी आता इच्छेनुसार इतर विभागात बदली व्हावी अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली. 
  
पदोन्नती द्या 
काही जणांनी पदोन्नतीचा विषय मांडला. 24 वर्षे उलटूनही पदोन्नती मिळालेली नाही, कनिष्ठ अभियंता पदावरच काम करावे लागत आहे. आमच्याही पदोन्नतीचा प्रामुख्याने विचार करून आम्हालाही अधिकार मिळावेत अशी अपेक्षा अभियंत्यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com