औरंगाबादच्या रस्त्यांवर ओवेसी म्हणताहेत "दुआ फरमाईये'

शेखलाल शेख
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरात हैदराबाद स्टाईलने प्रचाराला सुरवात केली आहे. हातात माईक घेऊन ते शहरातील रस्त्यांवर फिरत अस्ससलाम अलैकुम, दुआ फरमाईये, धान्य रखना, खाला, भाई असे संबोधित करत पदयात्रा करत आहे. 

मागील विधानसभा, महापालिका, लोकसभेनंतर ओवेसी यांनी या विधानसभा निवडणुकीत सुद्धा शेवटच्या टप्प्यात औरंगाबाद शहरात तळ ठोकला आहे. हैदराबादेत ज्या प्रमाणे गल्लोगल्ली ते कोपरा सभा घेतात त्याप्रमाणे औरंगाबाद शहरात सभा घेतल्या जात आहे.

शुक्रवार (ता.18) रोजी ओवेसी यांनी शहर सकाळी नऊ वाजता नवाबपुरा, नगिना मशीद, रेंगटीपुरा, संजयनगर, कैसर कॉलनी, रोशनगेट रोड, युनूस कॉलनी, टाइम्स कॉलनी, हीनानगर, रशीदपुरा, गणेश कॉलनी येथे पदयात्रा काढल्या. त्यांच्या सोबत मध्यचे उमेदवार नासेर सिद्दीकी, पुर्वचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांची उपस्थिती होती. गल्लीतून फिरतांना ओवेसी हे प्रत्येक घरात आणि दुकानात जाऊन हस्त आंदोलन करत प्रचार करत आहे. त्यांना बघण्यासाठी शहरातील गल्ल्यांमध्ये गर्दी होत आहे. सध्या प्रचारात हैदराबादच्या प्रचाराचा फार्मुल्यास प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. 
--- 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about asadsuddin owaisi