सावेंना कॅबिनेट मंत्री करण्याची जबाबदारी माझी -रावसाहेब दानवे --

मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन करताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अतुल सावे, मान्यवर.
मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन करताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अतुल सावे, मान्यवर.

औरंगाबाद : अतुल सावे यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सतत ते आमच्यासोबत आहेत. त्यांच्यामुळे 25 कोटी रुपये शहराला मिळाले. ते खर्च होत नाही तोच 100 कोटी रुपये मिळाले. चार महिन्यांत सावेंनी 1680 कोटींची पाणी पुरवठा योजना आणली. यामुळे अतुल सावे यांना निवडून द्या, कॅबिनेट मंत्री करण्याची जबाबदारी माझी राहील, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी (ता.एक) सांगितले. 

महायुतीचे पूर्वचे उमेदवार अतुल सावे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे सिडको एन-दोन येथे दानवे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, जयसिंगराव गायकवाड, डॉ. भागवत कराड, एकनाथ जाधव, उपमहापौर विजय औताडे, संजय केणेकर, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, प्रमोद राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

राज्यमंत्री सावे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी रस्ता, कचरा प्रश्‍नासंदर्भात डीपीआर सादर करण्यापूर्वीच 90 कोटी रुपये दिले. माझ्यावर विश्‍वास दाखवून राज्यमंत्री केले. शहरासाठी 1,680 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. पाणीप्रश्‍नासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले. आता दोन आयटी पार्कशी बोलणी सुरू आहे. हे ऑरिक सिटीत आल्यास अनेकांना नोकरी मिळेल. लोकसभा निवडणुकीत 72 हजार लोकांनी मतदान केली नाही. म्हणून आपला पराभव झाला. यामुळे मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. 

विमानतळावरून 19 फेऱ्या 

जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे आम्ही विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न केले. येत्या आठ तारखेपासून स्पाईस जेट, एअर इंडिया, इंडिगो विमानसेवा सुरू होणार आहे. 19 विमान फेऱ्या येथून सुरू होतील असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com