esakal | फेब्रुवारीपासून सात महिन्यांत अडीच कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

बस पुढे अन प्रवासी मागे अशी शहर बसची स्थिती असली तरी गेल्या सात महिन्यांत फेब्रुवारीपासून ते 16 ऑगस्टपर्यंत 21 लाख 83 हजार 718 प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. यातून तिकीटापोटी 2 कोटी 56 लाख 85 हजार 306 रुपयांचे उत्पन्न झाले आहेत.

फेब्रुवारीपासून सात महिन्यांत अडीच कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : बस पुढे अन प्रवासी मागे अशी शहर बसची स्थिती असली तरी गेल्या सात महिन्यांत फेब्रुवारीपासून ते 16 ऑगस्टपर्यंत 21 लाख 83 हजार 718 प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. यातून तिकीटापोटी 2 कोटी 56 लाख 85 हजार 306 रुपयांचे उत्पन्न झाले आहेत. आणखी नवीन स्मार्ट बसेस सुरू करण्यासाठी 186 चालक वाहकांची आवश्‍यकता असून, त्याची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. 


महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पॅनसिटीतून 23 जानेवारीला स्मार्ट बससेवा सुरू केली आहे. उद्‌घाटनानंतर 11 दिवसांनी स्मार्ट बसचे वेळापत्रक जाहीर झाले. परिवहन महामंडळामार्फत महापालिका ही बससेवा देत आहे. सुरवातीला 24 बसे 14 मार्गांवर सुरू करण्यात आल्या. पुन्हा 15 दिवसांनंतर तीन नवीन बसेसची भर पडली. यात वाढ होत सद्या 22 मार्गांवर 49 बसेस धावत आहेत.

चार बस या एखादी नादुरुस्त झाली तर पर्यायी व्यवस्था म्हणून राखीव ठेवण्यात आल्या असून, अशा एकूण 53 बस शहरवासीयांच्या सेवेत आहेत. आजपर्यंत स्मार्ट बसेसमधून 21 लाख 83 हजार 718 प्रवाशांनी प्रवास केला. सात महिन्यांत एकूण 13 लाख 53 हजार 352 किलोमीटरचे अंतर या बसेस धावल्या आहेत; तथापि 55 ते 61 टक्के बस या रिकाम्याच धावताना दिसत आहे. कारण नियोजित बस स्टॉपवर चालक प्रवाशांनी हात दाखविल्यानंतर बस थांबवत नाही, बस स्टॉपवर कोणती बस किती वाजता येणार आणि कोणत्या मार्गे जाणार याचे वेळापत्रक नसल्याने बसची प्रवाशांची अडचण होत आहे. 

प्रवाशांत वाढ 
महापालिका व एसटी महामंडळाचे योग्य नियोजन नसतानाही वाढत्या बसेसच्या प्रमाणात प्रवाशांची संख्या वाढताना दिसते आहे. फेब्रुवारी महिन्यात 2 लाख 27 हजार 521 प्रवाशांनी प्रवास केला. जुलैमध्ये 4 लाख 5 हजार 656 प्रवाशांनी प्रवास केला. ही आकडेवारी पाहता प्रवाशांचा कल स्मार्ट बसने प्रवास करण्याकडे वाढत आहे. एकूण 100 बसेसचे नियोजन करण्यात आले असून सध्या 53 बसेस उपलब्ध असून उर्वरित बसेस सुरू करण्यासाठी 186 चालक-वाहकांची आवश्‍यकता असून त्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.  

 
 

loading image
go to top