व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून ऐवज पळविणारे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

- परंडा ते सोनारी मार्गावर घडलेली घटना 
- चार लाख 13 हजार रुपयांचा ऐवज लंपास 
 

परंडा (जि.उस्मानाबाद) : परंडा ते सोनारी मार्गावर सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यांत चटणी टाकून चोरट्यांनी पावणेपाच लाखांचा ऐवज चोरीप्रकरणात पोलिसांनी तिघांना जेरबंद केले आहे. बॅग हिसकावून चोरट्यांनी 10 तोळे सोने, पावणेदोन किलो चांदीचे दागिने व रोख सात हजार रुपये असा एकुण चार लाख 13 हजार रुपयांचा ऐवज लंपास केले होते. पोलिसांनी तिघांना जेरबंद करून लुटलेल्या ऐवजापैकी एक लाख आठ हजार 968 रुपयांचे सोने, चांदीचे दागिने न्यायालयाच्या आदेशान्वये रविवारी (ता.24) फिर्यादीकडे सुपुर्दू केले. 

आमदार निवासातून 11 मोबाईल जप्त
परंडा शहरातील वसंत शहाणे हे तालुक्‍यातील डोंजा येथे सोने चांदीचे दागिने दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय करतात. चार जुलै रोजी डोंजा येथील आठवडे बाजार असल्याने दिवसभर व्यवसाय केल्यानंतर ते सायंकाळी दुचाकीने पत्नीसह परंड्याकडे येत होते. दरम्यान, परंडा-सोनारी मार्गावर महावितरण केंद्राजवळ तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी शहाणे यांना कुर्डूवाडीला जाण्यासाठी कोणता मार्ग आहे, अशी विचारणा करीत त्यांच्या डोळ्यांत चटणी पूड फेकली. त्यानंतर त्यांच्या पत्नीजवळ असलेली सोने-चांदीच्या दागिन्याची बॅग हिसकावुन घेऊन दुचाकीवरुन पसार झाले. या प्रकरणी वसंत शहाणे यांनी पाच जुलैला परंडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलिस निरिक्षक रावसाहेब राठोड यांनी तपास केला. 

आमदार निवासातून 11 मोबाईल जप्त
पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, सहायक पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल खांबे, पोलिस निरीक्षक इक्‍बाल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरीचा तपास लावून विजय बाबु काळे (रा. देवगाव, ता. परंडा), सनी उर्फ संदीप महादेव चव्हाण (रा. डोंजा, ता. परंडा), आकाश बाबासाहेब अडागळे (रा. पाचपिंपळा, ता. परंडा) या संशयितांना ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यातील चोरी झालेल्या सोने, चांदी, दागदागिने ऐवजांपैकी एक लाख आठ हजार 968 रुपयांचा ऐवज फिर्यादी वसंत शहाणे यांच्या ताब्यात देण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about crime