आता एक हजार रुपये थकवले तरीही तोडणार वीजपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

विद्युत बिलापोटी एक हजार रुपये थकवणाऱ्या ग्राहकांची संख्या 36 हजारांवर गेली आहे. म्हणून महावितरणतर्फे एक ते सहा ऑगस्टदरम्यान या ग्राहकांचा वीजपुरवठा
तोडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे हजारो घरांमध्ये अंधार पसरण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबाद - विद्युत बिलापोटी एक हजार रुपये थकवणाऱ्या ग्राहकांची संख्या 36 हजारांवर गेली आहे. म्हणून महावितरणतर्फे एक ते सहा ऑगस्टदरम्यान या ग्राहकांचा वीजपुरवठा
तोडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे हजारो घरांमध्ये अंधार पसरण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबाद शहर विभागात महावितरणच्या वीज ग्राहकांची संख्या जवळपास तीन लाखांच्या घरात आहे. यापैकी अनेक वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने वेळोवेळी थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम राबविली आहे. तरीही थकबाकीचे प्रमाण कमी होत नाही. एक हजार रुपयाचे वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांची संख्या जवळपास 36 हजारांवर पोचली आहे. किमान रक्कम असल्यामुळे महावितरण अशा ग्राहकांचा वीजपुरवठा तोडत नाही, त्यामुळेच ही अल्प रक्कम असलेल्यांची थकबाकी वाढत आहे. म्हणूनच गुरुवारपासून (ता. एक) एक हजार रुपये थकलेल्या ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम येत्या मंगळवारपर्यंत (ता.सहा) सुरू राहणार आहे.

एक हजार रुपये वीजबिलाची थकबाकी आहे, अशा ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तातडीने वीजबिल भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Cut off electricity power connection