औरंगाबाद महापालिका भरणार डॉक्‍टरांची 19 पदे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात डॉक्‍टरांची 19 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी दोन दिवसांत शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे आयुक्त डॉ. निपुण
विनायक यांनी सांगितले. 

औरंगाबाद - महापालिकेच्या आरोग्य केंद्रात डॉक्‍टरांची 19 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी दोन दिवसांत शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे आयुक्त डॉ. निपुण
विनायक यांनी सांगितले. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाचा नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी नुकताच मुंबईत आढावा घेतला. यासंदर्भात माहिती देताना आयुक्‍त म्हणाले, महापालिकेची शहरात 34 रुग्णालये असून, त्यात 19 डॉक्‍टरांची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविल्यास त्यास तातडीने मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री सागर यांनी दिले.

महापालिकेच्या नव्या आकृतिबंधामध्ये आरोग्य विभागातील 15 डॉक्‍टर्स आणि 21 तज्ज्ञ डॉक्‍टरांची पदे भरती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आकृतिबंध सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यात आला आहे. असे असले तरी 19 रिक्त पदे भरण्याऐवजी आकृतिबंधामध्ये नमूद करण्यात आलेल्या डॉक्‍टरांच्या 36 पदांची भरती करण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. डॉक्‍टरांची भरती करण्यासाठी शासनाकडे दोन दिवसांत प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about doctors 19 posts