औरंगाबाद पश्‍चिममध्ये डझनभर उमेदवार रिंगणात

अनिल जमधडे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद,  : औरंगाबाद पश्‍चिम राखीव विधानसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भाजपचे बंडखोर बाळासाहेब गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे दुसरे बंडखोर राजू शिंदे यांच्यासह 12 उमदेवार रिंगणात राहिले आहेत. 

पश्‍चिम विधानसभा निवडणुकीसाठी 13 उमेदवारांची अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शेवटच्या क्षणी बाळासाहेब गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 12 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कॉंग्रेसचे पुरस्कृत रिपाइंचे (डी) उमेदवार रामेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने कॉंग्रेंस बाद झाली आहे. उमेदवारी अर्ज घेण्याची वेळ संपल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. 
-- 
असे आहेत उमेदवार? 
संजय शिरसाट (शिवसेना), संदीप शिरसाट (वंचित बहुजन आघाडी), अरुण बोर्डे (एमआयएम), फकीरचंद अवचरमल (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडीया), मनीषा ऊर्फ मंदा खरात (बहुजन महापार्टी), प्रदीप त्रिभुवन (प्रहर जनशक्ती पक्ष), राजू शिंदे (अपक्ष, भाजप बंडखोर), अमोल राईवाले (अपक्ष), किरण चाबुकस्वार (अपक्ष), पंकजा माने (अपक्ष), रमेश जाधव (अपक्ष), विनोद माळी (अपक्ष).  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about elecation