
जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी बळीराम रखमाजी कान्हुले (वय 42) यांनी शेलगाव शिवारातील गट क्रमांक 551 मधील स्वतःच्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 11) सकाळी उघडकीस आली.
बदनापूर (जि. जालना) - जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी बळीराम रखमाजी कान्हुले (वय 42) यांनी शेलगाव शिवारातील गट क्रमांक 551 मधील स्वतःच्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 11) सकाळी उघडकीस आली.
कान्हुले यांच्याकडे अडीच एकर शेती असून त्यांनी खासगी बँकांकडून जवळपास पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे त्यांना कर्ज फेडण्याची चिंता सतावत होती.
त्यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे, अशी माहिती मात्रेवाडीचे उपसरपंच भगवान मात्रे यांनी दिली.