सोने-चांदी घ्यायची? तर आताच घ्या! दर घसरले 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाच्या मूल्यात झालेली वाढ आणि आंतराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या दरात मागील आठ दिवसांत एक हजार रुपयांनी, तर चांदीच्या दरात 1,500 रुपयांपर्यंत घट झाली. सोमवारी शुद्ध 10 ग्रॅम सोने 33 हजार 500 रुपये, तर चांदी 40 हजार रुपये प्रतिकिलोने विक्री झाल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली.

 लग्नसराईच्या तोंडावरच सोन्याचे दर हे 34 हजारांवर गेल्यानंतरही ग्राहकांनी खरेदीवर फारसा परिणाम झाला नाही. यंदा दुष्काळामुळे लग्नसराईत सोन्याच्या बाजारात अपेक्षित उलाढाल झाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा दर वाढल्याने सोन्याच्या दरात प्रतितोळा एक हजार रुपयांपर्यंत घसरण झाली. गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे दिसून येते. ट्रेडर्सच्या म्हणण्यानुसार स्थानिक ज्वेलर्स आणि कमजोर जागतिक संकेतामुळे सोन्याचे भाव कमी झाल्याचे म्हटले जात आहे.

सध्या लग्नसराईमुळे सोने, चांदीला मागणी कायम आहे. सोन्याच्या दरात घट होत असल्याने आगामी काळात सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मराठवाड्यात दुष्काळस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असताना मार्केटमध्ये फारसा उठाव दिसून येत नाही. लग्नसराईदेखील संपत आल्याने सोने-चांदीसह इतर मार्केटवर मोठा परिणाम होणार आहे.

आठ दिवसांतील सोन्याचे दर
तारीख  भाव 
5 मार्च  33 हजार 800 
6 मार्च  34 हजार 
7 मार्च  33 हजार 500 
8 मार्च  33 हजार 300 
9 मार्च  33 हजार 200 
11 मार्च  33 हजार 500 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com