esakal | हे तर पाकीटमार सरकार ; वृंदा कारत यांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

photo

हे तर पाकीटमार सरकार ; वृंदा कारत यांचा आरोप

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : ""केंद्र सरकारने नुकतीच गॅस सिलिंडरच्या किमतीत 145 रुपयांची दरवाढ केली. मोदी सरकारने नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प हा निराशाजनक आहे. सध्या देशाची आर्थिक व्यवस्था संकटात आहे. मोदीसरकारमुळे हे संकट आणखीच गडद होत आहे. हे पाकीटमार सरकार आहे'', अशी टीका कम्युनिष्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा कारत यांनी केली. 

शहरातील व्याख्यानमालेसाठी वृंदा कारत औरंगाबादेत आल्या होत्या. व्याख्यानापूर्वी त्यांनी सिटू कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ""केंद्र सरकारने बजेट सादर केल्यावर तीन दिवसांनी जेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑल इज वेल असे सांगितले; पण ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा  राज ठाकरे अडकले, आणि मग...   

सेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांनी काय केले  

एलआयसी, एअर इंडिया यासारख्या महत्त्वाच्या कंपन्या विक्रीस काढल्या आहेत. देशात रोजगाराच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. मनेरगा योजनेसाठीच्या निधीत नऊ हजार 500 कोटींची कपात केली. अन्न सुरक्षा निधीतही 75 हजार कोटींची कपात करण्यात आली. एनआरसी आणि एमपीआर हे या सरकारचे राजकीय त्रिशुळ आहे. हा धर्मनिरपेक्षतेवर आघात आहे.

वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा   

एमपीआरच्या संदर्भात सरकारला उत्तर द्यावेच लागणार आहे. देशात या कायद्याची गरज नाही'', असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला प्रा. पंडित मुंडे, ऍड. मनोहर टाकसाळ, उद्धव भवलकर, उमाकांत राठोड, भगवान भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हेही वाचा- सयाजी शिंदे म्हणाले, मी वड बोलतोय... माझा जन्म १८५७ चा 

शहीद दिनी देशभर आंदोलन 

""शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्चला फासावर लटकवण्यात आले होते. या शहीद दिवसाचे औचित्य साधून देशभरात डावे पुरोगामी पक्ष संघटनातर्फे देशभरात या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहेत. भीमा कोरेगावच्या घटनेच्या पाठीमागे आरएसएस होते हे लपून राहिले नाही'', असाही आरोपही कारत यांनी केला.