तब्बल 25 टन वजन अन्‌ दीड किलोमीटरचा अॅव्हरेज, मिशन रेबीज व्हॅनची चर्चा

रेबीज व्हॅन
रेबीज व्हॅन

औरंगाबाद - जागतिक आरोग्य संघटनेतर्फे शहरे रेबीजमुक्त करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली 'मिशन रेबीज' व्हॅन सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन शुक्रवारी (ता. दोन) महापालिकेत दाखल झाली. व्हॅनचे वजन तब्बल 25 टन असून, लांबी चाळीस फूट तर एक लिटर डिझेलला फक्त दीड किलोमीटरचा तिचा अॅव्हरेज आहे. या अवाढव्य व्हॅनची महापालिकेत दिवसभर चर्चा होती. 

जागतिक आरोग्य संघटनेने मिशन रेबीजमुक्तीची घोषणा केली आहे. त्यानुसार मर्सिडीज बेंझच्या सहकार्याने अमेरिकेत मिशन रेबीज व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन भारतात डब्ल्यूव्हीएसमार्फत (वल्ड वाइल्ड व्हेटर्नरी) 2013 पासून विविध शहरांत काम करत आहे. या व्हॅनमध्ये सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय, एल्किन डिजिटल एक्‍सरे युनिट, एम-सोनोसाईट, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी, ऑक्‍सिमेंट 302, इंटिग्रेटेड ऍनेस्थेटिक आणि दंत चिकित्सालय आहे. त्याचबरोबर लिफ्ट, सोफा, तीन टीव्ही, किचन अशा सुविधादेखील आहेत.

महिनाभरात या व्हॅनच्या माध्यमातून ऍनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया व पशुसंवर्धन मंत्रालयातर्फे नागपूर शहरात महिनाभर पशुचिकित्सकांमध्ये शस्त्रक्रिया, कुत्र्यांची नसबंदी यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. ही "मिशन रेबीज' व्हॅन पुणे येथे जात असताना औरंगाबाद शहरात शुक्रवारी काही काळ थांबली. महापौरांसह इतरांनी व्हॅनची पाहणी केली. महापालिका मुख्यालयात दिवसभर या व्हॅनचीच चर्चा होती. 
 
शहरात महिनाभरासाठी  मिळू शकते व्हॅन 
यावेळी प्रवीण ओव्हळ यांनी सांगितले, की रांची शहर रेबीज फ्री झाले आहे. त्याठिकाणी असलेल्या सुमारे 50 हजार कुत्र्यांवर लसीकरण करण्यात आले. महापालिकेने झारखंड येथील एका संस्थेला शहरातील कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम दिले आहे. ही संस्था डब्ल्यूव्हीएससोबत काम करते. त्यामुळे ही व्हॅन महिनाभरासाठी औरंगाबाद शहराला मिळू शकते. जेणेकरून शहरातील मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, अशी कामे केली जाऊ शकतात. यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com