esakal | उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी बैठक घेणार
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत अनेक बाबींची पूर्तता झाली नसल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी जिल्हा प्रशासनाकडे असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे स्थलांतरीत करण्याची विनंती केली होती.

उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी बैठक घेणार

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाकडे प्रलंबित आहे. त्या पार्श्वभुमीवर आरोग्यमंत्री, संबंधित अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक मुंबईत घेणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या काही वर्षांपासून उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होऊ लागली आहे. यापूर्वीच्या सरकारनेही येथे महाविद्यालय होणार असल्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर विधानमंडळाच्या अधिवेशनातही तत्कालिन मंत्री यांनी उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पुर्नउच्चार केला होता. प्रत्यक्षात अजुनही अनेक बाबींची पूर्तता झाली नसल्याचे समोर आले आहे.

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा

गेल्या आठवड्यात वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी जिल्हा प्रशासनाकडे असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे स्थलांतरीत करण्याची विनंती केली होती. तसे अधिकृत पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते. त्यामुळे याबाबतीत अजुनही बऱ्याच गोष्टी करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले होते.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर..

त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, की उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ही येथील जनतेची खुप वर्षापासुनची मागणी आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मी याकडे लक्ष दिले आहे. याबाबत सरकार अत्यंत सकारात्मक असून, या ठिकाणी महाविद्यालय व्हावे अशी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सध्या प्रस्तावाला आवश्‍यक त्या प्रशासकीय बाबी आम्ही तपासुन पाहत आहोत, जे आवश्‍यक आहे त्याची पुर्तता करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे, सबंधित विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची एक बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीनंतर निश्‍चितपणे महाविद्यालयाच्या कोणत्या बाबी आवश्‍यक आहेत, त्यातील कशाची पुर्तता झालेली आहे, हे लक्षात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.