तीन मतदारसंघांमध्ये एकही अर्ज दाखल नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघांत सोमवारी (ता. 30) एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघांत सोमवारी (ता. 30) एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. परंडा मतदारसंघामध्ये मात्र एकाने उमेदवारी अर्ज दाखल केला.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून (ता. 27) सुरवात झाली आहे. सोमवारी उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा मतदारसंघांमध्ये एकानेही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. परंडा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून महादेव शंकर लोखंडे यांनी आज अर्ज दाखल केला आहे.

 
उमरगा मतदारसंघातून आज 43 जणांनी 44, तुळजापूर मतदारसंघातून 21 जणांनी 51, उस्मानाबाद मतदारसंघातून 31 जणांनी 49 आणि परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 जणांनी 14 उमेदवारी अर्ज ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती यंत्रणेने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about politics