उमरगा, दाळिंब मंडळांत अतिवृष्टी

उमरगा ः पाण्याने वेढलेला शेंडगे रुग्णालयाचा परिसर.
उमरगा ः पाण्याने वेढलेला शेंडगे रुग्णालयाचा परिसर.

उमरगा (जि.उस्मानाबाद) ः शहरासह परिसरात मंगळवारी (ता. 24) रात्री साडेबाराच्या सुमारास एक तास दमदार पाऊस झाल्याने उमरगा महसूल मंडळात 88, तर दाळिंब मंडळात सर्वाधिक 108 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. एकूण पाच महसूल मंडळांपैकी उमरगा व दाळिंब महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.


शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील दत्त मंदिर परिसर, एल.टी. मोरे प्लॉटिंग आणि ओ. के. पाटीलनगरमध्ये पाणी साचले होते. शहरातील अनेक भागांतील घरांत पावसाचे पाणी शिरले. पहाटेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर पाणी होते. सकाळी पाणी ओसरले होते. मात्र, शिवाई, शेंडगे रुग्णालयाच्या परिसरासह लगतच्या दुकानांसमोर पाण्याचे तळे साचले होते. यंदा परतीच्या पावसात मंगळवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने नागरिकांना अतिवृष्टीच्या पुनरावृत्तीचे चित्र दिसून आले. मुळज शिवारात श्‍यामराव माणिक चव्हाण यांच्या मालकीचा बैल वीज कोसळल्याने दगावला. 


यंदा प्रारंभीच्या काळात तालुक्‍यात पाऊस कमी होता. उशिरा झालेल्या पेरणीनंतर काही प्रमाणात खरीप हंगामातील पिकांची स्थिती बरी होती. मात्र, तब्बल एक महिना पाऊस गायब झाल्याने मूग, उडीद पिकांची वाढ खुंटली. कालांतराने पावसाने सुरवात केली असली, तरी सोयाबीनला त्याचा फायदा होऊ शकला नाही. ऐन फळधारणेत पाऊस नसल्याने शेंगा भरल्या नाहीत. अनेक संकटातून पिके जगविण्याच्या धडपडीत शेतकऱ्यांनी मूग, उडिदाची काढणी सुरू करून राशीही सुरू केल्या होत्या. सोयाबीनला फळधारणा कमी आहे, काही दिवसांनी त्याची काढणी करावी लागणार असताना मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे झालेल्या पावसाने आणखी विघ्न निर्माण झाले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com