इंदुरीकर महाराज मुद्दाम बोलले नाहीत : रोहित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद : शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार रोहित पवार.

निवृत्ती महाराज इंदुरीकर समाजप्रबोधनाचे काम करतात. एखादे वाक्य ते चुकून बोलले असतील. मात्र मुद्दाम बोलले नाहीत; मात्र त्यांचेही वाक्य गरज असेल तर तपासावे, असे आमदार रोहित पवार म्हणाले. 

इंदुरीकर महाराज मुद्दाम बोलले नाहीत : रोहित पवार

उस्मानाबाद : योग्य व्यवसाय निवडून मोठे होण्याचे स्वप्न बघा. प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास निश्‍चित यश मिळेल, असा विश्‍वास देत उद्योजक तथा आमदार रोहित पवार यांनी तरुणांची मने जिंकली. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित ‘उद्योजकता आणि तरुणाई’ या विषयावरील व्याख्यानात मंगळवारी (ता. १८) ते बोलत होते.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, डॉ. प्रतापसिंह पाटील, प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष अभिजित निंबाळकर, ॲड. व्यंकट गुंड, आशिष मोदाणी आदी यावेळी उपस्थित होते. 

हेही वाचा जालना बनलाय गावठी बंदुकवाल्यांचा अड्डा?

आमदार पवार म्हणाले, की काहीजण व्यवसाय करण्यासाठी अनेक कारणे सांगतात. भांडवल नाही, जागा नाही, असे सांगून व्यवसायापासून दूर जातात. मात्र युवकांमध्ये धमक आहे. ही धमक सत्कारणी लागली पाहिजे. कोणताही व्यवसाय निवडला तरीही त्यात यश मिळू शकते. मात्र त्याला प्रामाणिकपणाची जोड असायला पाहिजे. लोकांचा तुमच्यावर विश्‍वास निर्माण झाला पाहिजे. त्यातूनच बीव्हीजी ग्रुपसारखे मोठे होता येते. अनेक बचतगट चांगले व्यवसाय करीत आहेत. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे, असे ते म्हणाले. 

वादापेक्षा विकासाकडे लक्ष द्या 
विद्यार्थी, शेतकरी, महिला एकत्र आल्या तर निश्‍चित यश येते. त्यासाठी सर्व समाजाला एकत्र घेऊन पुढे जायला पाहिजे. काहीजण समाजात वाद निर्माण करतात. युवकांची माथी भडकविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. वाद निर्माण करणे सोपे असते; पण विकासकामे करणे, औद्योगिक विकास करणे, मतदारसंघात एमआयडीसी आणणे मोठे अवघड असल्याचे सांगत चुकीच्या गोष्टीचे समर्थन करू नका, असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. 

इंदुरीकरांचे समर्थन 
निवृत्ती महाराज इंदुरीकर समाजप्रबोधनाचे काम करतात. एखादे वाक्य ते चुकून बोलले असतील. मात्र मुद्दाम बोलले नाहीत. जसे भाजपचे लोक काही वाक्ये मुद्दाम बोलून वाद वाढवतात तसे बोलले नसावेत, असे म्हणत श्री. पवार यांनी त्यांचे समर्थन  केली आहे. मात्र त्यांचेही वाक्य गरज असेल तर तपासावे, असेही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Rohit PawarOsmanabad