ज्येष्ठ, दिव्यांग, गरोदर मातांना मोफत सेवा, मतदानाच्या दिवशी पाचशे ऑटो रिक्षाची व्यवस्था

अनिल जमधडे
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद, : विधानसभा निवडणुकीत दिव्यांग, गरोदर माता व ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत सहज जाता यावे, यासाठी प्रशासनातर्फे जवळपास पाचशे ऑटो रिक्षांची सुविधा दिली जाणार आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेच्या वेळी प्रशासकीय यंत्रणेने दिव्यांग मतदारांचा मतदानप्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी विशेष भूमिका पार पाडली होती.

दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासस्थानापासून ते मतदान केंद्रापर्यंत आणून त्यांचे मतदान झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानापर्यंत सोडण्यासाठी प्रशासनाने भाडेतत्त्वावर तीनशे ऑटो रिक्षा घेतल्या होत्या. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेसाठीही प्रशासन सज्ज झाले असून, या निवडणुकीत जवळपास पाचशे ऑटो रिक्षा भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मतदानप्रक्रियेत अंपग, वृद्ध, गरोदर माता, दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about rto