बदनामीच्या भीतीने वडिलाची आत्महत्या

सुरेश लंगडे
सुरेश लंगडे

अणदूर (जि.उस्मानाबाद) ः अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल झाल्याने बदनामीच्या भीतीने वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत नातेवाइकांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात रविवारी (ता. 22) दुपारी एकपासून रात्री सातपर्यंत ठिय्या मांडला होता. कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जळकोटला गेले.


अणदूर येथील सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश नागप्पा लंगडे (वय 52) यांनी रविवारी पहाटे त्यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (ता. 21) रात्री उशिरा त्यांचा मुलगा शशांक लंगडे याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. सुरेश लंगडे हे अतिशय संवेदनशील म्हणून सुपरिचित होते. मात्र मुलावर गुन्हा दाखल झाल्यामुळे समाजात आपली बदनामी होईल, या भीतीने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अल्पवयीन मुलीच्या पालकांनी धमकावून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला. तसेच जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. संबंधित मुलीच्या पालकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत मृताच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दुपारपासून ठिय्या मांडला होता. संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी नळदुर्ग पोलिस ठाणे गाठले.


दरम्यान, सुरेश लंगडे यांचा मुलगा गौरीशंकर लंगडे यांनी तक्रारअर्ज दिला असून, त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. सहायक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे तपास करीत आहेत. दरम्यान, सुरेश लंगडे यांच्या निधनाचे वृत्त गावात समजातच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com