भरदिवसा घर फोडून चार लाखांचा ऐवज लंपास

File photo
File photo

उदगीर (जि. लातूर) : शहरातील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आनंदनगर भागात शुक्रवारी (ता.20) भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली आहे. या घरफोडीत एकूण चार लाख 18 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शहरातील आनंदनगर भागात राहणारे शिक्षक शिवराज नागनाथ बिरादार हे शुक्रवारी (ता. 20) सकाळी साडेआठच्या सुमारास घराचे कुलूप बंद करून आतनूर येथे गेले होते. रात्री पावणेनऊच्या सुमारास ते घरी परत आले असता घराचे दार उघडे दिसले. घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा कोणीतरी ड्युप्लिकेट चावीने उघडून आतील ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्यात तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, एक तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ, एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, साडेतीन तोळे वजनाचे गंठण, दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या चार अंगठ्या, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, चार ग्रॅम वजनाची सोन्याची फुले, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची सरपाळे आणि रोख 30 हजार रुपये असा एकूण चार लाख 18 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

 
याप्रकरणी शिवराज बिरादार यांनी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सोपानराव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. गायके अधिक तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com