लाखो भाविकांनी फुलली तुळजापूरनगरी

तुळजापूर ः तुळजाभवानी मातेची मूर्ती.
तुळजापूर ः तुळजाभवानी मातेची मूर्ती.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त रविवारी (ता.13) लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेसाठी शनिवारी (ता.12) रात्रीपासूनच भाविकांचा ओघ शहरात सुरू झाला होता. दिवसभरात शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.

 
तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यांतून लाखो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. शहरात शनिवारी मध्यरात्रीपासून पायी येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरू झाला. घाटशीळमार्गे दर्शन मंडपातून भाविक देवीच्या दर्शनासाठी दिवसभर जात होते. बहुतांश भाविक तुळजाभवानी मातेच्या महाद्वारातूनच दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघत होते. शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. हातात झांजा, गळ्यात कवड्याच्या माळा, परडी हातात घेऊन आई राजा उदो उदोच्या गजरात दर्शनासाठी जात होते. 


तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रविवारी पहाटे देवीची मूर्ती सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आल्यानंतर अभिषेक, धुपारती झाली. त्यानंतर पलंगवाले, पालखीवाले यांचे नैवेद्य तुळजाभवानी मातेस दाखविण्यात आले. सकाळी सहा वाजता नित्योपचार, अभिषेक पूजा सुरू झाले. साडेनऊपर्यंत अभिषेक, धुपारती तसेच अंगारा मिरवणूक झाली. मंदिरात धर्मदर्शन, मुखदर्शन, देवीस ओटी भरणे यासह विविध धार्मिक कार्यक्रम भाविकांनी केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास सोलापूरच्या मानाच्या काठ्या शहरात दाखल झाल्या. काठ्यांचे घाटशीळ रस्त्यावर प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, कार्यालयीन अधीक्षक भारत साळुंके यांनी परंपरेने स्वागत केले. सोलापूरच्या अंबाबाई मंदिर आणि जगदंबा मंदिर यांच्या शिवलाड समाजाच्या काठ्यांचे स्वागत करण्यात आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com