तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजा शुल्कात वाढ

File photo
File photo

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या सिंहासन, अभिषेक पूजांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. 

तुळजाभवानी मंदिर समितीची शनिवारी (ता. 18) बैठक झाली. जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीच्या अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे अध्यक्षस्थानी होत्या. आमदार राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, तहसीलदार सौदागर तांदळे आदी उपस्थित होते.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा, निर्णय झाले. त्यात पूजा शुल्कात वाढीचा समावेश आहे. दह्याच्या सिंहासन पूजेसाठी पूर्वी 900 रुपये होते, आता बाराशे रुपये लागतील. श्रीखंड सिंहासन पूजेसाठी पूर्वी एक हजार रुपये शुल्क होते. आता ते एक हजार 501 रुपये करण्यात आले. अभिषेकाला पाच लोकांसाठी 50 रुपये कर होता, तो आता दोन लोकांसाठी 50 रुपये करण्यात आला आहे.

अभिषेकासाठी पाच लोकांची पूर्वीची मर्यादा कायम ठेवण्यात आली असून उर्वरित तीन लोकांसाठी वेगळे शुल्क असेल. प्रशासकीय सूत्रांनी या शुल्कवाढीला दुजोरा दिला आहे. नगराध्यक्ष, मंदिर समितीचे विश्वस्त चंद्रकांत कणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही सिंहासन पूजा, अभिषेक पूजेच्या शुल्कात वाढ झाल्याचे सांगितले. 
दरम्यान, मंदिर समितीच्या अंतर्गत येणाऱ्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर चर्चा झाली. महाविद्यालयातील सेवकांना 132 टक्के डीए देण्याचे ठरले. 

दररोज हजारो भाविक घेतात दर्शन 
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी तुळजापूर एक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. शारदीय नवरात्रोत्सव, शाकंभरी नवरात्रोत्सव उत्साहात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. नवरात्र महोत्सवात भवानीमातेचे भक्त राज्यभरातून येत मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com