'विठ्ठल साई' कारखान्याची निवडणूक बिनविरोध

बसवराज पाटील
बसवराज पाटील

उमरगा (जि. उस्मानाबाद) : मुरूम (ता. उमरगा) येथील विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याची चौथी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीत 28 नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. मंगळवारी (ता. 28) नामनिर्देशनपत्र परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी 21 नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष, माजी राज्यमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची निवडणूक चौथ्यांदा बिनविरोध होण्याची परंपरा कायम राहिली आहे. 

तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीशी निगडीत असलेल्या विठ्ठलसाई साखर कारखान्याची उभारणी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी खडतर परिश्रमातून पूर्ण केली आहे. माळरानावर हा कारखाना उभारण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला. कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून यात कोणत्याही प्रकारचे राजकारण न येऊ देता कौशल्याने कारखाना एक हाती सांभाळला.

तालुक्‍यातील शेतकरी सभासदांना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न श्री. पाटील यांनी केला आहे. कारखान्याच्या उभारणीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

वीस वर्षांपासून संचालक मंडळांनी केलेल्या सकारात्मक कामाची पावती आणि कारखान्याचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी कारखाना एकहाती टिकवत नेहमी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याने कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनीही अप्रत्यक्ष सहकार्याची भावना ठेवल्याने कारखान्याची निवडणूक चौथ्यांदा बिनविरोध झाली आहे. 

असे आहेत नवनियुक्त संचालक मंडळ 
बसवराज माधवराव पाटील, बापूराव माधवराव पाटील, शरण बसवराज पाटील, माणिकराव हणमंतराव राठोड, विठ्ठलराव प्रल्हादराव पाटील, सुभाष ग्यानबा राजोळे, केशवराव नागनाथ पवार, दिलीप बाबुराव पाटील, शरणप्पा विश्वनाथ पत्रिके, चंद्रकांत रेवनसिद्ध साखरे, संगमेश्वर विश्वनाथ घाळे, राजीव शरणप्पा हेबळे, विठ्ठलराव चंद्रशेखर बदोले, शब्बीर अब्दुलगणी जमादार, रामकृष्णपंत व्यंकटराव खरोसेकर, सादिकसाहेब अब्दुलकादर काझी, शिवलिंग महादप्पा माळी, शिवमूर्ती तम्मना भांडेकर, दत्तू (दिलीप) रोहिदास भालेराव, मंगलताई व्यंकटराव गरड, इरमाबाई शरणय्या स्वामी. 

शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे सुरू केल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिल्यासारखे होते. राजकिय क्षेत्रात काम करताना सामाजीक, सहकार क्षेत्रात भरीव करण्याचा सकारात्मक हेतू ठेवला. विठ्ठलसाई साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला हातभार लावल्याचे आत्मिक समाधान मिळते. वीस वर्षात अनेक चढउतार आले तरीही कारखाना जिद्दीने सुरू ठेवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासही कारखान्याच्या प्रगतीला हातभार लावणारा ठरला आहे. पुढील काळातही कारखान्याची वाटचाल पारदर्शकपणे, शेतकरी हिताच्या दृष्टीने राहिल. 
- बसवराज पाटील, अध्यक्ष, विठ्ठलसाई साखर कारखाना, मुरुम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com